Pune: पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमुळे गरीब कुटुंबांना मोठा आधार- चंद्रकांत पाटील

Pune: Great support to poor families due to Prime Minister's Poor Welfare Scheme says bjp state president Chandrakant Patil या निर्णयामुळे तब्बल 80 कोटी गरीब कुटुंबांना रेशन दुकानातून पाच किलो गहू किंवा तांदूळ, तसेच एक किलो डाळ मोफत मिळणार आहे.

एमपीसी न्यूज – पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढविण्याच्या निर्णयाचा देशातल्या 80 कोटी नागरिकांना थेट लाभ होणार असून यामुळे गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने त्यांनी आभारही मानले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘कोरोना महामारीशी आपण सर्वजण लढत असतानाच, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आता अनलॉक 2 मध्ये प्रवेश करत आहोत. मात्र, सध्या अनेक गरीब कुटुंबांना यातून बाहेर पडण्यासाठी वेळ लागत आहे.

त्यातच आगामी काळ हा सण-वारांचा असल्याने, सण-समारंभ छोट्या प्रमाणात साजरे करतानाही या कुटुंबांवर आर्थिक भार पडणार आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करुन नरेंद्र मोदीच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने गरीब कुटुंबांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देऊन नोव्हेंबर 2020 पर्यंत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे तब्बल 80 कोटी गरीब कुटुंबांना रेशन दुकानातून पाच किलो गहू किंवा तांदूळ, तसेच एक किलो डाळ मोफत मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारला 90 हजार कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करत आहे.

या निर्णयामुळे मोदीजीं प्राथमिकता नेहमीच गरीबांचे कल्याण राहिले आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशनकार्ड’वर भर दिला आहे. यासाठी सर्व राज्य सरकारांनाही आवाहन केले आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत, राज्यातील प्रत्येक गरीब कुटुंबांना रेशनवर धान्य उपलब्ध करून द्यावे. यात कोणताही दुजाभाव करु नये.

केंद्र सरकार गरीबांच्या कल्याणासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत आधीचे आणि आताचे मिळून दीड लाख कोटी रुपये इतका निधी खर्च करत आहे. राज्य सरकारनेही आता आपल्या तिजोरीतून निधी उपलब्ध करून द्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.