Pune : हिंदू जनजागृती समितीतर्फे विद्यार्थिनींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – हिंदू जनजागृती समितीच्या (Pune) वतीने गुरुवारी (दि.19) मुलींचे आगरकर हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय, सोमवार पेठ पुणे या शाळेत ‘मुलींचे आरोग्य कसे सांभाळावे’ या विषयी डॉ. मुक्ता लोटलीकर यांनी मार्गदर्शन केले.

या मार्गदर्शनाचा लाभ 105 विद्यार्थिनींनी घेतला. यामध्ये मुलींनी आरोग्याची काळजी कशी घ्यायची, तसेच आहार आणि व्यायाम याचेही महत्त्व सांगितले. तसेच मुलींच्या प्रश्नांना डॉ. मुक्ता लोटलीकर यांनी समर्पक उत्तरेही दिली. शाळेच्या शिक्षिका सुनीता लोणकर यांनी उपक्रमास साहाय्य केले. जाधव आणि वैशाली गुजर यांनी आयोजनात सहभाग घेतला आणि उपक्रम यशस्वी केला.

Pune : ब्लॅकमेल करत फेसबुक फ्रेंडचा 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार

याबरोबरच पुण्यातील रास्तापेठ येथील सरदार लक्ष्मीबाई रास्ते (Pune) प्राथमिक शाळा, येथे बुधवारी (दि.18) दिवशी बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने खाऊ वाटप उपक्रम झाला. याचा लाभ मुलांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण 120 जणांनी घेतला.

शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा मोहन चाबुकस्वार यांनीही उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाळेत नैतिक मूल्य किंवा संस्कार वर्ग घ्यावे अशीही मागणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.