Pune News : पुण्यात सिटी क्लब करंडक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन; 21 संघ होणार सहभागी

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने व सिटी फुटबॉल क्लबच्यावतीने सिटी क्लब करंडक बाद पध्दतीच्या फुटबॉल स्पर्धा उद्यापासून ( दि. 12 नोव्हें.) सुरू होणार आहे. सदर स्पर्धा मोशी (जिल्हा पुणे) येथे नव्यानेच तयार करण्यात आलेल्या फुटबॉल टर्फच्या मैदानावर होणार आहे.

करोना प्रादुर्भावा नंतर क्लबस्तरावर होणारी ही पुणे शहरातील पहिलीच स्पर्धा आहे. स्पर्धेत सुपर डिव्हिजन मधील रूपाली एस. सी., एआयवायएफए, परशुरामियन्स् एप. सी., इंद्रायणी एस. सी., संगम यंग बॉईज् या संघांना प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीतील संघांचे आव्हान असणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक व रोख पारितोषिक दिली जाणार आहे. यासह या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट गोलरक्षक, डिफेन्डर, मिडफिल्डर आणि उत्कृष्ट आघाडी फळीतील खेळाडू (फॉरवर्ड) यांना सुध्दा चषक देण्यात येणार आहेत.

स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना शनिवार 13 नोव्हेंबर रोजी सिटी फुटबॉल क्लब विरूध्द एएफए सॅमफोर्ड एफ. सी. यांच्यात दुपारी 2 वाजता होणार आहे. यानंतर केपी इलेव्हन विरूध्द पुणेरी वॉरियर्स एफसी यांच्यात सामना होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.