Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघातात पती-पत्नी जागीच ठार

एमपीसी न्यूज- पुण्यामध्ये भीषण अपघातामध्ये (Pune ) पती-पत्नींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर हा अपघात आज (शुक्रवार दि.12) सकाळी साडेसातच्या सुमारास झाला आहे. 

ज्ञानेश्वर वाल्मीक लवांडे (वय 50 वर्षे ,रा. कपिल मल्हार, बाणेर गाव ,पुणे) व उषा ज्ञानेश्वर लवांडे( वय 45 वर्ष) या पती-पत्नींचा अपघातात मृत्यू झालेला आहे.

MPC News Podcast 12 May 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

मिळालेल्या माहितीनुसार, लवांडे दांपत्य बाणेर वरून कोथळे पुरंदर कडे दहाव्याच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या MH12 VH 9789 या दुचाकी वरुन जात असताना कात्रज कोंढवा रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये  पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

इस्कॉन टेंपल चौकाजवळील आरएमडी शाळेसमोर ही घटना घडली.अपघाताची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात (Pune ) आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.