Pune : सावरकर दौडने होणार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती सप्ताहाची सुरुवात

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि विवेक व्यासपीठ यांच्या सहकार्याने (Pune ) “सावरकर जयंती सप्ताह प्रारंभ निमित्त” पुण्यात 21 मे पासून फर्ग्युसन महाविद्यालय ते डेक्कन कॉर्नर येथील सावरकर अध्यासन केंद्र या मार्गावर सकाळी सात ते नऊ या वेळेत “सावरकर दौड” आयोजित करण्यात आली आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त),युद्ध सेवा मेडल ने सन्मानित, ज्येष्ठ सेना अधिकारी आणि सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सौरभ गोखले यांच्या हस्ते निशाण दाखवून ‘सावरकर दौड’ ला सुरुवात होईल. सावरकर आणि सैनिकीकरण या विषयावरील माहितीने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघातात पती-पत्नी जागीच ठार

ही दौड फर्ग्युसन महाविद्यालय – ज्ञानेश्वर पादुका चौक – मॉडर्न महाविद्यालय – बालगंधर्व – डेक्कन जिमखाना – डेक्कन कॉर्नर (सावरकर अध्यासन केंद्र येथे समारोप) या मार्गावरून असेल. या दौड कार्यक्रमात सर्व वयोगटातील स्त्री पुरुष सहभागी होणार असून यात विविध सामाजिक संस्थांना सहभागी करून घेणार आहोत.

तरी जास्तीत जास्त सावरकरप्रेमींनी या सावरकर दौड मधे https://forms.gle/Wk5dhxG7temXgb8q8 या गुगल लिंकवर फॉर्म भरून सहभागी होता येणार आहे.तसेच अधिक माहितीसाठी  9561491625, 9850409041, 9420787048 या क्रमांकावर संपर्क साधता येता येणार (Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.