Pune : मी संसदेच्या नव्या वास्तूच्या  उद्घाटन कार्यक्रमाला गेलो नाही याचे समाधान – शरद पवार

एमपीसी न्यूज : मी संसदेच्या नव्या वास्तूच्या  (Pune) उद्घाटन कार्यक्रमाला गेलो नाही. त्याबद्दल मला अधिक समाधान वाटत आहे. ज्या लोकांची कार्यक्रमाला उपस्थितीत होती, त्या ठिकाणी धर्मकांड पाहिल्यावर आधुनिक भारताची संकल्पना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली; ती संकल्पना आणि आता जे संसदेत सुरू आहे. त्यामध्ये जमीन आस्मानाचा अंतर आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

संसदेच्या नव्या वास्तूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती आज झाले. पण या उद्घाटन सोहोळ्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला असताना, त्याच दरम्यान पुण्यात शरद पवार यांनी या उद्घाटन सोहोळ्याबाबत भूमिका मांडली आहे.

यावेळी शरद पवार म्हणाले की, आपण देशाला पुन्हा एकदा काही वर्ष पाठीमागे घेऊन जात आहोत अशी चिंता वाटत आहे. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक विज्ञानावर समाज तयार करण्याची भूमिका सतत मांडली. तसेच आज तिथे जे काही चाललय त्याच्या नेमक उलट चाललय.

Pune News : ज्येष्ठ नृत्य गुरु पं. मनीषा साठे यांचा सत्तराव्या वाढदिवसानिमित्त सत्कार

तसेच पुढे म्हणाले की, संसदेच्या कोणत्याही कामकाजाची सुरुवात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या भाषणामुळे होते. त्यामुळे त्यांना कार्यक्रमाला (Pune) निमंत्रित करण्याची जबाबदारी होती. तसेच मी राज्यसभेचा सभासद असून राज्यसभेचे प्रमुख उपराष्ट्रपती आहेत. त्या कार्यक्रमामध्ये लोकसभेचे स्पिकर दिसेल. पण, राज्यसभेचे स्पिकर, उपराष्ट्रपती कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे हा उद्घाटन सोहळा मर्यादित घटकापुरता होता की काय? अशी शंका निर्माण झाली असल्याचे सांगत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.