Pune: सहा मीटर रस्त्यांवर उंच इमारती उभ्या राहिल्या तर वाहतूक प्रश्न आणखी बिकट: आयुक्त

Pune: If tall buildings are erected on six meter roads, the traffic problem will be even worse: Commissioner shekhar gaikwad शहरातील 6 मीटरचे सर्व रस्ते 9 मीटर होणे आवश्यक आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. टीडीआर खर्ची पडून नवीन बांधकामे होणार आहेत. त्यामुळे महापालिकेला उत्पन्न मिळणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील सर्वात गंभीर प्रश्न हा वाहतुकीचा आहे. 6 मीटर रस्त्यांवर उंचच उंच इमारती उभ्या राहिल्यावर वाहतुकीची समस्या आणखी बिकट होणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शासनाला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे.

शहरातील 6 मीटरचे सर्व रस्ते 9 मीटर होणे आवश्यक आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. टीडीआर खर्ची पडून नवीन बांधकामे होणार आहेत. त्यामुळे महापालिकेला उत्पन्न मिळणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

सर्वच रस्ते 9 मीटर करणे चुकीचे असल्याचे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना-मनसे या विरोधी पक्षांचे म्हणणे होते. त्यानुसार मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

त्या बैठकीत स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती. यासंदर्भात वस्तुस्थितीदर्शक अहवाल पाठविण्याची सूचना आयुक्तांना करण्यात आली होती.

भूसंपादन करताना रोखीने मोबदला न देता टीडीआर देणे परवडते. पैसे खर्च न करता रस्त्यांचे रुंदीकरण आवश्यक आहे. त्यामुळे 6 मीटर रस्त्यांपेक्षा 9 मीटर रस्त्यांवरच टीडीआर वापरण्यास परवानगी द्यावी.

6 मीटर रस्त्यांवर उंचच उंच इमारती उभ्या राहिल्यास वाहतूक समस्या बिकट होणार आहे. पुणे शहराचा नियोजनबद्ध विकास होण्याऐवजी बकालपणा वाढण्याची भीती आयुक्तांनी व्यक्त केली आहे. तर, अनेक इमारतींच्या सुरक्षा भिंती रस्त्यालगत आहेत. त्या जून्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.