Pune : पुणे लोकसभा उमेदवारी संदर्भात निरीक्षकांनी मते जाणून घेतली – धीरज घाटे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या (Pune) सुचनेनुसार भाजपचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह आणि बाळासाहेब पाटील यांनी आज पक्षाचे निरीक्षक म्हणून पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारी संदर्भात आजी-माजी खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. ते आपला गोपनीय अहवाल प्रदेश भाजपाला सादर करणार आहेत, अशी माहिती पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.

Maharashtra News : राज्यातील 1446 एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश

वन टू वन ही चर्चा झाली. दुपारी 12 ते 7 या वेळेत भाजप कार्यालयात ही चर्चा झाली. याचा गोपनीय अहवाल प्रदेश भाजपला पाठविणार आहेत. आणि त्यानंतर दिल्लीत आज होत (Pune) असलेल्या बैठकीत त्यावर चर्चा होणार असल्याचे समजते. दरम्यान, पुणे लोकसभा निवडणुकीसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील देवधर, राज्यसभेचे माजी खासदार संजयनाना काकडे हे प्रमुख इच्छुक आहेत. आणखी 2 ते 3 जण पडद्याआडून इच्छुक आहेत. या निरीक्षकांनी वन टू वन चर्चा केल्याने नेमका गोपनीय अहवाल काय पाठविला, याची उत्सूकता लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.