Pune : आयपीएचतर्फे मंगळवारी ‘माध्यान्ह’ ज्येष्ठ नागरिक कुटुंबियांसाठी स्वमदत गट

एमपीसी न्यूज- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH) तर्फे ‘माध्यान्ह’ या ज्येष्ठ नागरिक कुटुंबीय स्वमदत गट या नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत दैनंदिन जीवनात ज्येष्ठांना सांभाळताना येणारे प्रश्न या विषयावर चर्चा करून त्यातून उत्तरे शोधायचा प्रयत्न केला जाणार आहे.

प्रत्येक महिन्याच्या सोमवारी हा ज्येष्ठ नागरिक कुटुंबीय स्वमदत गट आयोजित केला जाणार आहे. मात्र सोमवारी दहीहंडी उत्सव असल्यामुळे या उपक्रमातील पहिला ‘माध्यान्ह’ स्वमदत गट मंगळवारी (दि.4 ) संध्याकाळी 6 ते 8 यावेळेत इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, 4, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी जवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वे नगर, पुणे येथे होणार आहे. (खुणेसाठी पत्ता- राजाराम पुलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली. आत शिरल्यावर उजवीकडे चवथा बंगला.) हा स्वमदत गट पूर्णपणे विनामूल्य असून त्याच लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.