Pune Kabaddi League: पुणे लीग कबड्डी स्पर्धेत स्पर्धकांचा करिष्मा

मपीसी न्यूज: राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, बाणेर- बालेवाडी- सूस व म्हाळुंगे आणि बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने म्हाळुंगे- बालेवाडी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या (Pune Kabaddi League) पुणे लीग कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सतेज संघाचे अध्यक्ष अर्जुन शिदे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह राजेंद्र आंदेकर, सहकार्यवाह दत्तात्रय कळमकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रवीण नेवाळे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य व स्पर्धेचे आयोजक बाबुराव चांदेरे, राष्ट्रीय खेळाडू सुनिल मोरे, स्पर्धेचे संयोजक अध्यक्ष समीर चांदेरे, अर्जुन ननावरे, डॉ. सागर बालवडकर, पुनम विधाते, स्पर्धेचे निरिक्षक भाऊसाहेब करपे, स्पर्धा पंच प्रमुख आंतरराष्ट्रीय पंच दत्ता झिंजुर्डे आदी उपस्थित होते.

 

पुणे लीग स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरूष विभागात बलाढ्य बारामती संघाने शिवनेरी जुन्नर संघावर 59-31 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला बलाढ्य बारामती संघाकडे 29-12 अशी भक्कम आघाडी होती. बलाढ्य बारामती संघाच्या अजित चव्हाण व बबलू गिरी यांनी उत्कृष्ठ खेळ केला. (Pune Kabbadi League) तर योगेश महामुनी यांनी चांगल्या पकडी घेतल्या. शिवनेरी जुन्नर संघाच्या आदिनाथ घुले व सनत मांडगे यांनी चांगला प्रतिकार केला.तर चेतन पारधी व सिध्देश काळे यांनी चांगल्या पकडी घेतल्या.

kabbadi

 

पुरूषांच्या दुसऱ्या सामन्यात झुंजार खेड संघाने माय मुळशी संघावर 35-34 अशी मात केली. मध्यांतराला झुंजार खेड संघ 12-14 असा पिछाडीवर होता. झुंजार खेड संघाच्या निखिल सांडभोर व समीर ढोकणे यांची आक्रमक खेळ करीत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. (Pune Kabbadi League) त्यांना शुभम पाटील व गौरव तापकीर यांनी चांगल्या पकडी केल्या. माय मुळशी संघाच्या शुभम कानसकर विनित कालेकर यांनी जोरदार चढाया केल्या. अनिकेत रोडे व सतेज पाटील यांनी चांगल्या पकडी केल्या.
 

 

 

महिलांच्या सामन्यात लयभारी पिंपरी चिंचवड संघाने झुंजार खेड संघावर 27-21 असा विजय मिळविला. मध्यंतराला लयभारी पिंपरी चिंचवड संघाकडे 10-9 अशी अवघ्या एक गुणांची आघाडी होती. लयभारी पिंपरी चिंचवड संघाच्या निकिता पडवळ व ऐश्वर्या पऱ्हाड यांनी चांगला खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. झुंजार खेड संघाच्या पल्लवी गावडे व आदिती जाधव यांनी चांगला प्रतिकार केला.

 

 

 

महिलांच्या दुसऱ्या सामन्यात बलाढ्य बारामती संघाने वेगवान पुणे संघावर 29-26 अशी मात करीत विजय संपादन केला. मध्यंतराला बलाढ्य बारामती संघाकडे 19-12 अशी आघाडी होती. (Pune Kabbadi Legaue) बलाढ्य बारामती संघाच्या आम्रपाली गलांडे व हर्षदा हुंडारे यांनी चांगला खेळ केला. वेगवान पुणे संघाच्या साक्षी काळे व माहेश्वरी वाघ यांनी चांगला प्रतिकार केला.
इतर झालेले सामने-  पुरुष विभाग- सिंहगड हवेली वि.वि. वेगवान पुणे(54-53),
महिला विभाग- शिवनेरा जुन्नर वि.वि. माय मुळशी (43-32)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.