Pune : महापालिकेच्या यंदाच्या बजेटसंदर्भात मागविले नगरसेवकांकडून पत्र

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे 2020 – 21 चे बजेट महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादर केले. त्यावर सध्या स्थायी समिती चर्चा करीत आहे. फेब्रुवारीच्या शेवटी अध्यक्ष हेमंत रासने बजेट सादर करणार आहेत. या बजेटमध्ये नगरसेवकांना विकासकामां संदर्भात पत्र मागविण्यात आले आहे, अशी माहिती सभागृह नेते धीरज घाटे यांनी दिली.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना किती निधी मिळणार?, याची उत्सुकता लागली आहे. काँगेस-राष्ट्रवादीने सत्तेच्या काळात ज्याप्रमाणे भाजपला बजेट दिले होते. त्याचप्रमाणे विरोधी पक्षांना निधी देणार असल्याची महापालिकेत चर्चा सुरू आहे.

महापालिका आयुक्तांनी 12 टक्के वाढविलेली मिळकत दरवाढ स्थायी समितीने रद्द केली आहे. त्यामुळे आयुक्तांचे बजेट 160 कोटींनी कमी झाले. तर, 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजनेची 15 टक्के पाणीपट्टी वाढ तशीच राहणार आहे. हेमंत रासने यांचे बजेट साडे 6 हजार कोटींच्या पुढे जाणार असल्याचे समजते. पुणेकरांवर कोणतीही करवाढ करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.