Pune : महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचा बैठकांचा धडाका

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका आयुक्तपदी निवड झाल्यानंतर शेखर गायकवाड यांनी सध्या बैठकांचा धडाकाच लावला आहे. स्वतः विविध कार्यालयात जाऊन कामकाज समजून घ्यायला सुरुवात केली आहे. यापूर्वीचे आयुक्त अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावून आढावा घेत होते.

शेखर गायकवाड यांनी ही प्रथा मोडून ते स्वतः प्रमुख अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हजेरी लावतात. कामकाज समजून घेऊन योग्य त्या सूचना करतात. पुणेकरांच्या समस्या मार्गी लावण्यावर त्यांचे प्रामुख्याने भर आहे. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या कार्यालयात हजेरी लावून आयुक्तांनी कामकाज समजावून घेतले.

यावेळी पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी उपस्थित होते. पुणे शहरात होणारा पाणीपुरवठा, 24 समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत बसविण्यात येणारे मीटर्स, संपूर्ण योजनेची आयुक्तांनी यावेळी माहिती घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.