Pune : ‘झोमॅटो गोल्ड’मधून पुण्यातील हॉटेल अँड बार व्यवसायिकांच लॉगऑऊट; 15 हॉटेल्स बंद

एमपीसी न्यूज – ‘झोमॅटो गोल्ड’ या ऑनलाइन सेवेतून ग्राहकांना सवलती देणे परवडत नसल्याने पुण्यातील सुमारे 450 हॉटेल अँड बार व्यवसायिकांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत यातून बाहेर पडण्याचा (लॉगऑऊट) निर्णय घेतला. त्यामुळे पुण्यातील सुमारे 15 हॉटेल बंद पडली आहेत.तसेच हि संख्या वाढणार असल्याचेही पुणे रेस्टोरंट अँड हॉटेलेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे सांगितले आहे.

‘झोमॅटो गोल्ड’ने ग्राहक वाढविण्याच्या प्रयत्नात भरपूर सवलती दिल्या. मात्र, ह्या सवलती हॉटेल हॉटेल अँड बार व्यवसायिकांना देणे परवडेनासे झाले. ‘झोमॅटो गोल्ड’चा वापर करणाऱया हॉटेलमध्ये या ऍपद्वारे जे ग्राहक जेवणासोबत आणि ड्रिंक्स घेतील त्यांच्यासाठी पन्नास टक्के (फिफ्टी परसेंट) सवलत देऊ केली. मात्र, लोक जेवण एका हॉटेलमधून तर, ड्रिंक्स एका हॉटेलमधून घेत होते. त्यामुळे यावर पन्नास टक्के (फिफ्टी परसेंट) सवलत देणे संबंधित हॉटेल चालकांना परवडेनासे झाले. यामुळे अनेक हॉटेल चालकांना नुकसान सोसावे लागले. याबाबत काही हॉटेल चालकांनी ‘झोमॅटो गोल्ड’शी चर्चा केली मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पुण्यातील सुमारे सुमारे 450 हॉटेल अँड बार व्यवसायिकांनी ‘झोमॅटो गोल्ड’ या ऑनलाइन सेवेतून लॉगऑऊट केले.

‘झोमॅटो गोल्ड’सारख्या सेवांकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या अटी-नियमांनुसार काम करणे शक्य नाही, असे पुणे रेस्तराँ अँड हॉटेलिअर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

देशातील सर्वाधिक हॉटेलिंग होणाऱ्या शहरात पुणे आघाडीवर आहे. आमच्या हॉटेलांमध्ये वर्षांनुवर्षे येणारे ग्राहक आहेत. मात्र, झोमॅटो गोल्डकडून मोठमोठय़ा सवलती दिल्या जातात. जवळपास 50 टक्क्य़ांपर्यंत सवलती दिल्या जात असल्याने ग्राहक हॉटेलकडे वळत नाहीत. या सेवेमुळे हॉटेल व्यवसाय वाढण्याऐवजी तोट्यात जात आहे. त्यामुळे ही परिस्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांना अधिक चांगली सेवा, खाद्य पदार्थ देण्याचा आमचा प्रयत्न असेल,असेही पुणे रेस्टोरंट अँड हॉटेलेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.