Pune Market News : गटारी अमावस्येनिमित्त खवय्यांकडून मटण, मासळी चिकनची खरेदी

एमपीसी न्यूज – गटारी अमावस्येमुळे पुणेकरी खवय्यांकडून मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रविवारी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. 

उद्या (सोमवारपासून) श्रावण महिन्याचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे पापलेट, सुरमई, हलवा, रावस, वाम या मासळीचे दर तेजीत होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिकनचे भाव किलोमागे 30 ते 40 रुपयांनी कमी झाले. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी 15 ते 20 टन, खाडीतील मासळी 200 ते 500 किलो, नदीतील मासळी एक ते दीड टन तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची मिळून 20 ते 25 टन एवढी आवक झाली, अशी माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिकनचे प्रतिकिलोचे दर 30 ते 40 रुपयांनी कमी झाले, अशी माहिती चिकन विक्रेते रुपेश परदेशी यांनी दिली. मटणाला चांगली मागणी राहिली,  असे पुणे मटण विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.

 

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर)

पापलेट : पापलेट : कापरी : 1500-1800, मोठे 1500-1600, मध्यम : 1000-1200, लहान 900-1300, भिला : 700, हलवा : 700-900, सुरमई : 800-1000, रावस : लहान 800-1100,  मोठा : 1200, घोळ : 800-900, करली : 400, पाला : 800-1200, वाम : पिवळी : 1100, काळी 1200, ओले बोंबील : 200-280, कोळंबी : 280, मोठी 400-550, जंबोप्रॉन्स : 1100-1200, किंगप्रॉन्स : 750-800, लॉबस्टर : 800-1000, मोरी : 240-360, खेकडे  : 200-280, चिंबो-या : 480-600.

खाडीची मासळी : नगली : 550-600, तांबोशी : 400, बांगडा : 200-240, शेवटे 160-280, तिस‍-या : 240, खुबे : 140.

नदीची मासळी : रहू : 100 – 160, कतला :  100 – 160, मरळ : 400 – 480, शिवडा : 240, खवली : 250, आम्ळी : 160, खेकडे : 200 – 240, वाम : 500 – 560.

चिकन : 120, लेगपीस : 250, जिवंत कोंबडी : 160, बोनलेस : 360.

अंडी : गावरान : शेकडा : 830, डझन : 108,  प्रति नग :

9,  इंग्लिश : शेकडा : 482 डझन : 60 प्रतिनग : 5.

मटण : बोकडाचे : 700, बोल्हाईचे : 700, खिमा : 700, कलेजी : 740.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.