Pune Market News : हिरवी मिरची, शेवगा, घेवड्याच्या भावात घट

एमपीसी न्यूज – मार्केट यार्डमध्ये रविवारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे हिरवी मिरची, सिमला मिरची, शेवगा, गाजर आणि घेवड्याच्या भावात घट झाली आहे. इतर सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापा-यांनी दिली़. रविवारी मार्केटयार्डात 90 ते 100 गाड्यांची आवक झाली.

परराज्यातून आलेल्या मालामध्ये मध्यप्रदेशातून येथून 6 ते 7 टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून 3 ते 5 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून 5 ते 6 टेम्पो शेवगा, गुजरात, कर्नाटकातून 14 ते 15 टेम्पो हिरवी मिरची, मध्यप्रदेश आणि गुजरातधून 8 ते 10 ट्रक लसूण,  आग्रा,  इंदौर,  गुजरात आणि स्थानिकमधून बटाट्याची 40 ते 45 ट्रक इतकी आवक झाली आहे.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले 1400 ते 1500 गोणी, कोबी सुमारे 5 ते 6 टेम्पो, फ्लाॅवर 8 ते 10 टेम्पो, भेंडी 7 ते 9 टेम्पो, गवार 7 ते 8 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, टोमॅटो 7 ते 8 हजार पेटी, तांबडा भोपळा 8 ते 10  टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, पावटा 4 ते 5 टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई आणि साता-याहून मटार 700  ते 800 गोणी, भूईमुग शेंग 150 पोती,  कांदा 55 ते 60 ट्रक इतकी आवक  झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :

कांदा : 150-190, बटाटा : 90-130, लसूण : 400 – 1000, आले : सातारी 130-220, भेंडी : 200-300, गवार : 300-400, टोमॅटो : 60-100, दोडका : 150-200, हिरवी मिरची : 150-300, दुधी भोपळा : 80-140, चवळी : 200 – 300, काकडी : 80 -120, कारली हिरवी 150 – 200, पांढरी 120-130, पापडी : 200-250, पडवळ : 160-180, फ्लाॅवर : 100-140, कोबी : 60-100, वांगी :

150-250, डिंगरी : 200-250, नवलकोल : 80-100, ढोबळी मिरची : 140-160, तोंडली : कळी 250-300, जाड 100-120, शेवगा : 200-300, गाजर 160-180, वालवर 300-400, बीट : 60-100, घेवडा : 300-350, कोहळा : 100-120, आर्वी : 200- 250, घोसावळे : 200-220, ढेमसे : 200-250, भुईमुग शेंग : 300-400, मटार :  स्थानिक : 500-600, पावटा : 300-350, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 160-180, नारळ : शेकडा 1000- 1600, मकाकणीस : 60-100.

कोथिंबीर, मेथी तेजीत

मध्यंतरी झालेल्या पावसामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला. चांगल्या प्रतीच्या कोथिंबीर, मेथी या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कोथिंबीरीची एक जुडी 15 ते 20 रुपये तसेच मेथीच्या एका जुडीची विक्री 22 ते 25 रुपये दराने केली जात आहे. आषाढ महिन्यात मेथी, कोथिंबीर यांच्या मागणीत वाढ होते. बाजारात सध्या मेथी, कोथिंबीरचे दर तेजीत असले, तरी श्रावणात कोथिंबीर, मेथीच्या मागणीत घट होते.

आषाढ महिन्यात कोथिंबीर आणि मेथीचे दर तेजीत असतात. श्रावण महिन्याचा प्रारंभ उद्या (सोमवारी) आहे. या महिन्यात पालेभाज्यांच्या मागणीत घट होते. गणेशोत्सवात पालेभाज्यांच्या मागणीत वाढ होणार आहे.

पालेभाज्यांचे घाऊक बाजारातील भाव (शेकडा जुडी )

कोथींबीर : 300 -1000, मेथी : 1000-2000, शेपू : 300-600, कांदापात : 600-900, चाकवत : 600-800, करडई : 300-600, पुदीना 100-300, अंबाडी 500-600, मुळा : 700-1200, राजगिरा : 200-400, चुका 500-800, चवळई : 300-500, पालक : 600-100.

 

किरकोळ बाजारातील दर

कोथिंबीर -15 ते 20 रुपये

मेथी – 22 ते 25 रुपये

पालक – 10 ते 20 रुपये

मुळा – 15 ते 20 रुपये

शेपू – 10 ते 15 रुपये

 

सीताफळ, पपई आणि लिंबाच्या भावात वाढ

रविवारी सीताफळ, पपई आणि लिंबाच्या भावात वाढ झाली आहे. अननस, संत्रा, डाळींब, कलिंगड, खरबूज, चिक्कू व पेरुचे भाव मात्र स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कलिंगड दोन ते तीन टेम्पो, खरबूज एक टेम्पो, अननस 1 ट्रक, मोसंबी 40 ते 50 टन, संत्री 1 टन, डाळिंब 40 ते 50 टन, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, पेरू 500 ते 600 के्रट, चिक्कू एक ते दीड हजार बॉक्स इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे – लिंबे (प्रति गोणी) : 150 -250, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 100 – 200, (4 डझन) : 30 ते 100, संत्रा : (10 किलो) : 300-600, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 23-130, गणेश : 25 – 130, आरक्ता 10-40. कलिंगड : 15-25, खरबूज : 20-35, पपई : 12-22, चिक्कू (10 किलो) 80 – 400, पेरू (20 किलो) : 300 – 400.

 

श्रावणामुळे फुलांना मागणी

मार्केटयार्डातील फुलबाजारात रविवारी फुलांच्या आवकेमध्ये वाढ झाली. तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने दर्जेदार फुलांचीही आवक वाढली आहे़. परिणामी भावातही वाढ झाली आहे.

किलोचे दर : झेंडू : 20 – 40, गुलछडी : 100 – 150, कापरी : 20 – 50, शेवंती : 25 – 50, मोगरा : 250 – 350, आॅस्टर : 20 – 30, गुलाबगड्डी (बारा नगाचे दर) : 20 – 30, गुलछडी काडी : 30 – 60, डच गुलाब (20 नग) : 50 – 100, लिलिबंडल (50 काडी) : 6-10, जर्बेरा : 20 – 40, कार्नेशियन : 80 – 120.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.