Pune : महापालिकेची 33 उद्याने उद्यापासून पुन्हा बंद – मुख्य उद्यान अधीक्षकांचे आदेश

Municipal Corporation's 33 parks closed again from tomorrow - Order of Chief Park Superintendent

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेची 33 उद्याने उद्या, गुरुवारपासून बंद करण्याचे आदेश मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी आज, बुधवारी दिले. त्यामुळे या उद्यानात आता व्यायाम, धावणे, चालणे यावर बंदी करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही उद्याने उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्याला सुरुवातीपासूनच महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध केला होता. शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना उद्याने सुरू ठेवणे बरोबर नाही, अशी भूमिका महापौरांनी मांडली होती.

शहरातील उद्याने सुरू झाल्याने उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. बाके, ओपन जिममधील व्यायाम साहित्याच्या वापरामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

उद्याने सुरू झाल्यानंतर नागरिकांकडून सामाजिक अंतर न ठेवणे, मास्क न घालणे, पुणे महापालिका कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्या सोबत गैरवर्तवणूक करणे, असे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेची ही 33 उद्याने बंद करण्याचे आदेश अशोक घोरपडे यांनी दिले आहेत.

दरम्यान, कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी म्हपालिकेचे अधिकारी – कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. उद्याने सुरू असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ होण्याची भीती होती. त्यामुळे ही 33 उद्याने बंद होणे गरजेचे असल्याचे महापौरांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.