Pune : मुरलीधर मोहोळ यांचा उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कोथरूडला महापौर पदाचा बहुमान मुरलीधर मोहोळ यांच्या रुपाने मिळाला. सर्व पक्षीय कोथरुडकर नेते, ऊद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, ऊच्चविद्या विभूषित मंडळी, सर्वच क्षेत्रातील कोथरुडकर यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार (सोमवार, दि. 17) सायंकाळी 4.30 वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरुड येथे आयोजित केला आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, ऍड. वंदना चव्हाण, राज्यसभेचे खासदार संजय काकडे, काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नागरी सत्कार होणार आहे, अशी माहिती माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी दिली.

जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ नागरी सत्कार समिती कोथरूडतर्फे केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.