Pune : मोदींजींना धन्यवाद देण्यासाठी नमो बाईक रॅलीचे आयोजन-सुनील देवधर

एमपीसी न्यूज – प्रभू श्रीराम जन्मभूमीसाठी सुरू असलेल्या तब्बल 500 वर्षांच्या(Pune ) संघर्षाची यशस्वी पूर्तता करून श्रीक्षेत्र अयोध्या येथे भव्य अशा राममंदिराची उभारणी केली.

त्यात श्रीरामललांची प्राणप्रतिष्ठापना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्याचे अभिनंदन तसेच श्रीरामलालांना अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते सुनील विश्वनाथ देवधर यांच्या नेतृत्वात ‘नमो पुणे अभिवादन’ या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार (दि. 11 फेब्रुवारी 2024) रोजी सकाळी 9 वाजता, (Pune )कृष्णसुंदर गार्डन, डीपी रोड, एरंडवणे, पुणे येथून या रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीत पुणेकर नागरिक बंधू – भगिनींना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सुनील देवधर यांनी केले आहे.

Pune : शरद पवारांच्या बेगडी लोकशाहीप्रेमाचा बुरखा निवडणूक आयोगाने उतरविला – माधव भांडारी

ही रॅली म्हात्रे पूल – शास्त्री रोड – माधवराव पेशवे रोड – बाजीराव रोड – शनिवार वाडा – मॉडर्न कॅफे – जंगली महाराज रोड – एफ. सी. रोड – ज्ञानेश्वर पादुका चौक मार्गे मॉडर्न इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या ठिकाणी ती संपेल. या रॅलीसाठी नागरिकांनी नोंदणी करणे अगत्याचे असून, त्यासाठी त्यांनी https:www.namopune.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

या बाईक रॅली तरुण – तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सुनील देवधर यांनी केले आहे. श्रीरामललांची प्राणप्रतिष्ठापना स्थापना करून अखिल हिंदुस्थानाचे गर्वस्थान आणि अस्मिता असलेल्या त्यामध्ये केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश अमृतकाळाबरोबरच आता रामराज्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करू लागला आहे, असे सुनील देवधर यांनी आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

सकल धनगर समाज मेळाव्याचे आयोजन
सर्व धनगर समाज बांधवांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती मिळावी, यासाठी पुणे धनगर समाजाकडून ‘सकल धनगर समाज मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (दि. 11 फेब्रुवारी 2024) आयोजित हा मेळावा शुभारंभ मंगल कार्यालय, म्हात्रे पुलाजवळ डीपी रोड एरंडवणे येथे सायंकाळी 4 वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून महा ऍग्रीएफपीओचे व्यवस्थापकीय संचालक ऍड. विजय गोफणे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर उपस्थित राहणार आहेत. याच बरोबर धनगर समाजाच्या विविध संघटनांच्या प्रमुखांचा सत्कार देखील यावेळी करण्यात येणार आहे. या मेळाव्यास धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती करून घ्यावी, असेही सुनील देवधर यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.