Pune : स्वारगेट ते कात्रज नियोजित मेट्रो मार्ग बदलल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

एमपीसी न्यूज- स्वारगेटपासून कात्रजपर्यंतच्या नियोजित मेट्रोमार्गात बदल करण्यात आला आहे. हा मार्ग बांधकाम व्यावसायिकासाठी वळविण्यात येत असल्याचा आरोप करीत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वारगेट चौकात आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या माध्यमातुन पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर आणि शिवाजीनगर ते कात्रज असा मेट्रो मार्ग उभारण्यात येत आहे. यामध्ये स्वारगेट ते कात्रज दरम्यानचा मार्ग बदलून स्वारगेट येथून मुकुंदनगर आणि गंगाधाम मार्गे कात्रजपर्यन्त नेण्याचे नियोजन आहे. बांधकाम व्यावसायिकासाठी हा मार्ग बदलण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्याच्या निषेधार्थ आज स्वारगेट चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी चेतन तुपे म्हणाले की, पुणे शहरातून स्वारगेट येथून कात्रज पर्यंत मेट्रो जाणार आहे. मात्र पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्वारगेट ते कात्रज या मार्गात बदल करून मुकुंदनगर आणि गंगाधाम मार्गे मेट्रो कात्रजपर्यन्त नेण्यात येणार आहे. हा मार्ग बांधकाम व्यावसायिकासाठी वळविण्यात येत आहे. ही निषेधार्थ बाब असून जर पूर्वीचा मार्ग न ठेवल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील तुपे यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.