Pune News: 3 लाख पुणेकर दुसरा डोस घेण्यासाठी करतायेत टाळाटाळ

एमपीसी न्यूज: केंद्र आणि राज्यसरकारने लसीकरण पूर्ण करण्याविषयी आदेश दिले आहेत. लसीकरण ना ऐच्छिक असेल तर सर्व नागरिकांनी घ्यावी यासाठी हर घर दस्तक’ मोहीम सुरू केली आहे. त्या माध्यमातून समुपदेशन केले जात आहे. यासाठी महापालिकेने पथके नेमली असून, ते घरोघरी जाऊन किती डोस झाले? किंवा कोणी घेतले की नाही, याची माहिती गोळा केली जात आहे. याच माध्यमातून गोळा केलेल्या माहितीत सुमारे तीन लाख जणांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे दिसून घेतली नसल्याचे दिसून आले आहे.

आतापर्यंत १३ लाख ६० हजार ३७० जणांना घरी जावून लस

जिल्ह्यात ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १३ लाख ६० हजार ३७० जणांना घरी जावून लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ग्रामीणमध्ये सहा लाख लसीकरण झाले. सध्या नव्याने आलेल्या करोनाच्या व्हेरियंटमुळे लसीकरण महत्त्वाचे असून, त्यासाठी अधिक भर दिला जात आहे.

‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत पुणे शहरात ३ लाख ६८ हजार ४९२, पिंपरी-चिंचवडमध्ये ३ लाख ९९ हजार ६०१, तर ग्रामीणमध्ये ५ लाख ९२ हजार २७७ लसीकरण झाले आहे. त्यामध्ये लसीचा पहिला आणि दुसरा डोसचा समावेश आहे.

आरोग्य विभागामार्फत नागरिकांचे समुपदेशन

महापालिकेने ‘हर घर दस्तक’ च्या माध्यमातून लस न घेतलेले आणि दुसरा डोस प्रलंबित असलेल्यांची माहिती गोळा केली आहे, अजूनही करत आहोत. लस ही ऐच्छिक आहे. तरीही नागरिकांनी ती घ्यावी यासाठी आरोग्य विभागामार्फत आपण नागरिकांचे समुपदेशन सुरूच ठेवले आहे. त्याचमुळे सुमारे १३ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. अशी माहिती पुणे महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. आशीष भारती यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.