Pune News : प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत सहा आवलियांचा कन्याकुमारी पर्यंत सायकल प्रवास

एमपीसी न्यूज – प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत सहा आवलियांनी पुणे ते कन्याकुमारीपर्यंत सायकलवरून प्रवास केला. पुण्यातील शनिवारवाडा येथून 7 नोव्हेंबर रोजी सुरू झालेला हा प्रवास सातारा, कोल्हापूर, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या चार राज्यातून जात 16 नोव्हेंबर रोजी कन्याकुमारी येथे समाप्त झाला. या प्रवासादरम्यान त्यांनी नागरिकांना प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला.

अजय मते (वय 50) विमा प्रतिनिधी, सुरेश खर्से (वय 47) एरोफाईन पॉलीमर प्रा. ली. मध्ये रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंन्ट अधिकारी, भालचंद्र रानवडे (वय 38) मेडीकल दुकान, पोपट जगताप (वय 58) अॅम्युनिशन फॅक्टरी कर्मचारी, विकास सांडभोर (वय 46) पवना सहकारी बँकेत शाखा व्यवस्थापक आणि नंदकुमार तांबे (वय 65) निवृत्त कर्मचारी अशी या सहाजणांची नावे आहेत.

सायकलवर जवळपास 20 किलो वजनाचे साहित्य घेऊन प्रत्येकाने प्रवासाचा एक एक टप्पा पूर्ण केला. प्रत्येक शहरातील प्रसिध्द ठिकाणाला भेट देत स्थानिकांना प्लास्टिक न वापरण्यास विनंती केली. चार राज्यातून प्रवास करीत सहाजणांनी 16 नोव्हेंबरला कन्याकुमारीत प्रवेश केला. कन्याकुमारीत प्रवेश केल्यानंतर नारायणपूरचे दत्त महाराजांच्या मठात दर्शन घेऊन त्या रात्री विवेकानंद केंद्रात मुक्काम केला. 19 नोव्हेंबरला रेल्वेने परतीचा प्रवास करून 20 नोव्हेंबर सर्वजण आपापल्या घरी सुखरूप पोहोचले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.