Pune News : 85 टक्के विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षेला पसंती

नवीन परीक्षा पद्धती आणि सध्याची तणावाची स्थिती लक्षात घेता, प्रश्न खूप गुंतागुंतीचे नसणार आहेत. वेळोवेळी मी याचा आढावा घेणार आहे.

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन या पर्यायातून जवळपास 85 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेला पसंती दिली आहे. एकूण 1 लाख 90 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला असून, त्यापैकी सुमारे 1 लाख 9 हजार विद्यार्थ्यांनी मोबाइलद्वारे परीक्षा देणार असल्याचे नमूद केले आहे. 

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यातील महाविद्यालयांतील अंतिम वर्षांच्या सुमारे 2,50,000 विद्यार्थ्यांपैकी सुमारे 1,90,000 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला आहे. विद्यार्थ्यांना माॅक टेस्ट परीक्षेच्या कमीत कमी 8 दिवस आधी उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या असून, परीक्षेत सुमारे 40% प्रश्न सोपे, 40% मध्यम, तर 20% कठीण असू शकतील असे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तानपुरे यांनी सांगितले आहे.
नवीन परीक्षा पद्धती आणि सध्याची तणावाची स्थिती लक्षात घेता, प्रश्न खूप गुंतागुंतीचे नसणार आहेत. वेळोवेळी मी याचा आढावा घेणार आहे. परीक्षा सुटसुटीत पद्धतीने व्हावी, यावर कटाक्ष असणार आहे. पुणे विद्यापीठाच्या परीक्षाप्रक्रिया बाबत उद्या पर्यंत विद्यापीठ परिपत्रक जाहीर करणार आहे. प्रोक्टोर्ड पद्धतीने परीक्षा होण्याची शक्यता खूप कमी आहे. उद्याच्या परिपत्रकात निश्चित माहिती दिली जाईल असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.