Pune Crime News : वीज मीटर जोडणी व ट्रान्सफर प्रकरणी लाच घेणारा प्रधान तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – नवीन सदनिकेच्या तीन फ्लॅटसाठी वीज मीटर जोडणी व एक वीज मीटर ट्रान्सफर करण्यासाठी 8 हजार रूपये लाच घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा प्रधान तंत्रज्ञ आणि आणखी एका इसमाला लाच लुचपत विभागाने अटक केली आहे.

विश्रांतवाडी शाखेत आज (शुक्रवारी) हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

संदीप दशरथ भोसले (वय 38, प्रधान तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी) आणि हरी लिंबराज सुर्यवंशी (वय 22, रा, लोहगाव) असे अटक आरोपींची नावे आहेत.

लाच लुचपत विभागाच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार, प्रधान तंत्रज्ञ याने तक्रारदाराकडे तीन वीज मीटर जोडणी व एक मीटर ट्रान्सफरसाठी आठ हजार रूपयांची लाच मागितली. अटक आरोपी हरी याने ही रक्कम स्विकारली त्यावेळी एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. लाच लुचपत विभागाचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत चौधरी अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.