Pune News: गणेश विसर्जन हौदांची व्यवस्था करा, अन्यथा…; शिवसेनेने दिला इशारा

गणेशोत्सव सर्व धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यांच्या भावनांचा आदर करता गणेश विसर्जन घरी करणे त्यांना सोईचे वाटत नाही.

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन हौदांची व्यवस्था करा, अन्यथा शिवसेना पुणेकरांना सहकार्य करेल, असा थेट इशारा शिवसेनेतर्फे आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे. आतापर्यंत पुणे महापालिकेतर्फे कोरोनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. त्याबद्दल पुणेकरांनी कधीच विरोध केला नाही. राज्य शासनाच्या सूचनेनुसार सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरवून मोठे सहकार्य केलेले आहे.

त्या पार्श्वभूमीवर विसर्जनाचे हैद उपलब्ध करून न दिल्यास नदीवर गणपती विसर्जन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. जर नदी प्रदूषित झाली तर याला पुणे महापालिकाच जबाबदार राहणार असल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, सहसंपर्क प्रमुख प्रशांत बधे, शाम देशपांडे, नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, संगीता ठोसर, शहर संघटिका सविता मते यांनी म्हटले आहे.

गणेशोत्सव सर्व धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यांच्या भावनांचा आदर करता गणेश विसर्जन घरी करणे त्यांना सोईचे वाटत नाही. कोरोनाच्या नावाखाली गणेश विसर्जनाची सोय करण्याचे मनपा कर्तव्य डावलत आहे. हे पुणेकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्यासारखे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.