Pune News : पत्रकार अर्णब गोस्वामी अटकेविरोधात पुणे शहर भाजपाकडून निदर्शने !

एमपीसी न्यूज – रिपब्लिक भारत चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगड पोलिसांनी त्यांच्या मुंबई येथील घरातून अटक करण्यात आली. याविरोधात राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी पुणे शहर भाजपच्या वतीने अभिनव चौक, टिळक रोड येथे आंदोलन करण्यात आले.

पत्रकार अर्णब गोस्वामी यांची महाविकास आघाडी सरकारने अवैध पद्धतीने अटक केली आहे. त्यामुळे राज्यात अघोषित आणीबाणी असल्यासारखे वातावरण आहे. पोलिसांकडे कोणतीही ठोस कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केली जात असल्याचा आरोप रिपब्लिक चॅनेलकडून करण्यात आला आहे.

याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर मुंबई पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत राज्यसरकार विरोधात भाजपाकडून रस्त्यांवर उतरून निदर्शने करण्यात आले.

याप्रसंगी शहराध्यक्ष जगदिश मुळीक, महापालिकेतील सभागृह नेता धीरज घाटे, गणेश घोष यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.