Pune News : देखभाल, दुरुस्तीसाठी शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

एमपीसी न्यूज – पर्वती जलकेंद्र पंपिंग, लष्कर जलकेंद्र पंपिंग,एस.एन.डी.टी.,वारजे जलकेंद्र,नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत,पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरवस्तीचे काम असल्यामुळे उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील गुरुवारी (ता. 2) पुर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी (ता.3) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

 

पाणी पुरवठा बंद असणारा भाग –

पर्वती जलकेंद्र भाग – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर,राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव,सहकार नगर, सातार रोड परिसर, पद्मावती,बिबवेवाडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एस.एन.डी.टी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरुड परिसर, डहाणूकर कोलनी, कर्वेनगर इत्यादी

 

लष्कर जलकेंद्र भाग – लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडिवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा,चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी

 

चतु:श्रृंगी, एस.एन.डी.टी, वारजे जलकेंद्र परिसर – भुसारी कोलनी, शास्त्रीनगर, बावधन,भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा, कोथरुड, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानी नगर, सुतारदरा, ड़हाणूकर कोलनी, परमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कोलनी, हॅपी कोलनी, गोसावी वस्ती, वारजे जकात नाका परिसर, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड हनुमाननगर इत्यादी भाग

 

नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग भाग – मुऴा रोड, खडकी, एमइएस,हरिगंगा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.