Pimpri News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष पदी सचिन कुलकर्णी, तर कार्याध्यक्ष पदी महेश बारसावडे, उपाध्यक्ष पदी शशिकांत कुलकर्णी, समाज माध्यम प्रमुख पदी सिद्धांत चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने व हिंद प्रतिष्ठानच्या विद्यामाने स्वातंञ्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंञ्यसूर्य हा कार्यक्रम घेण्यात आला. आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकाराम नगर पिंपरी येथे हा कार्यक्रम झाला. यात महासंघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

महत्त्वपूर्ण अधिकाधिक नुतन सदस्य सभासदांची जिल्हा प्रमुख पदावर नेमणुक करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव कुलकर्णी, प्रदेश सदस्य पुष्कराज गोवर्धन, आंतरा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती पत्र देण्यात आले.

जिल्हा संघटकपदी सचिन बोधनी, महिला अध्यक्ष सुषमा वैद्य, प्रसिद्धी प्रमुख वृंदा गोसावी, उद्योजक आघाडी प्रमुख कार्तिक गोवर्धन, सरचिटणीस आनंद देशमुख, कोषाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, पुरोहित आघाडी चित्तरंजन जोशी, तसेच अन्य अनेक पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली.

स्वातंत्र्यसूर्य आधारित स्वर संजिवनी गायन कार्यक्रम झाला. गायक प्रणव कुलकर्णी, जेष्ठ गायक रवींद्र गांगुर्डे, तर सह गायक अपर्णा कुलकर्णी, सारंग पाडळकर, मंदार लिमये, ओंकार पाटणकर, तेजस चव्हाण, निलेश कुलकर्णी, सागर चव्हाण यांनी सादरीकरण केले.

कार्यक्रमासाठी माधव तिखे, महेश जोशी, प्रविण कुरबेट, अशोक मुळे, हणुमंत रामदासी, वामन वासुदेव, प्रकाश जोशी आदी उपस्थित होते. सचिन बोधनी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.