Pune News : क्लेफ्टचा उपचार करा आता मोफत!

एमपीसी न्यूज – आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालय (Pune News) व अखिल भारतीय महिला सेवा समाजाचा संयुक्त विद्यमाने cleft म्हणजेच फाटलेले ओठ, फाटलेला टाळू, किंवा जन्मजात ओठ, टाळू, तोंड,नाक ह्यात दोष असलेल्या रुग्णांना मोफत सेवा उपलब्ध करुन देणार आहेत. या सेवांमध्ये मोफत स्पीच थेरपी, ब्रेसेस, पोषण आणि आहारासाठी मदत, तसेच तोंडाचे आरोग्य, कान, नाक, घसा याची तपासणी आणि सर्व कुटुंबियांची येण्याजाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

एबीएमएसएससह पर्सीस्टंट फाउंडेशन पुणे यांचा पाठिंबा असल्याने या प्रकल्पाअंतर्गत पुणे आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या तपासणी शिबिर आणि जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून जन्मजात फुटलेल्या ओठ व टाळू असलेल्या मुलांचा शोध घेतला जाईल व त्यांना आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलमधे उपचारार्थ पाठवले जाईल. हॉस्पिटलद्वारे फुटलेल्या ओठ व टाळूला पुन्हा जोडण्यासाठीची शस्त्रक्रिया व इतर सर्व सेवा सर्व रुग्णांना मोफत दिल्या जातील. हे एकाच छताखाली सर्वसमावेश cleft देणारे महाराष्ट्रातील एकमेव केंद्र असेल.

Maharashtra News : आता उपग्रह आणि ड्रोनद्वारे होणार नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या सीईओ (Pune News) रेखा दुबे म्हणाल्या, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे की, आम्ही मुलांचे जीवन बदलणाऱ्या या शस्त्रक्रिया देऊ शकलो आहोत. हॉस्पिटलचा दृष्टिकोन कायम ठेवत आम्ही जागतिक दर्जाच्या किफायतशीर आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच कोणतेही मूल किंवा त्यांच्या पालकांना ओठ व टाळूच या शस्त्रक्रियांसाठी दोष न देण्याची खात्री घेत आहोत. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून मला आनंद झाला आहे. अधिक माहितीसाठी आदित्य बिर्ला रुग्णालयात संपर्क साधण्याचे त्यांनी आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.