PMRDA: जयंती, उत्सावासाठीचा भूखंड बिल्डरांच्या घशात घालू नका, विविध संघटनांचे घंटा नाद आंदोलन

एमपीसी न्यूज – निगडी भक्ती-शक्ती चौक (PMRDA) येथील पेठ क्रमांक 24 हा संपूर्ण भूखंड जंयती, उत्सावासाठी आरक्षित ठेवावा. हा भूखंड बिल्डरांच्या घशात घालू नये मागणीसाठी विविध संघटनांनी आकुर्डीतील पीएमआरडीएच्या कार्यालयासमोर टाळ व घंटानाद आंदोलन केले. याबाबत पीएमआरडीचे आयुक्त राहुल महिवाल यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरातील भक्ती-शक्ती चौक येथे पीएमआरडीए अखत्यारीत असलेल्या भूखंडापैकी काही क्षेत्राचे नुकतेच वाटप करण्यात आले आहे. या भूखंडावर अनेक वर्षांपासून अनेक महापुरुषांच्या जयंतीचे / उत्सवांचे कार्यक्रम केले जातात. प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते.

तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती, मोहम्मद पैगंबर जयंती त्याठिकाणी सार्वजनिकरित्या साजरी केली जाऊ शकते. तसेच निगडी गावठाणचा जत्रा महोत्सव, किर्तन सप्ताह, राजकीय ,अध्यात्मिक, साहित्य सभा संमेलने, कामगार मिळावे. सर्व राजकीय पक्षांच्या सभा होण्यासाठी हा भुखंड खुला राहणे शहर विकासासाठी महत्त्वाचे आहे. इतर वेळी या खुल्या भूखंडाचा वापर मुलांना खेळण्यासाठी मैदान म्हणून देखील होऊ शकतो.

हा भूखंड तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (PMRDA) यांचे नियोजन क्षेत्रात होता. प्राधिकरणाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत हा भूखंड मोकळाच आहे. हा भूखंड शहरातील प्रमुख अशा भक्ती-शक्ती शिल्पसमूहालगत आहे. जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येथूनच जातो.

पीएमआरडीएमार्फत या भूखंडाचे प्लॉट पाडून त्यातील काही क्षेत्र विक्री करण्यात आले आहे. परंतु, निगडी परिसरातील नागरिक व प्रामुख्याने वारकरी मंडळी आणि शिवभक्त यांचा व शहरातील सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक मंडळांचा या भूखंड विक्रीला तीव्र विरोध आहे.

पीएमआरडीएने हे भूखंड विक्री रद्द करून भूखंड हे सार्वजनिक वापराचे प्रयोजनासाठी राखीव ठेवावा अशी सर्वांचीच मागणी आहे. नागरिकांची मागणी मान्य न करताच भक्ती – शक्ती चौकातील भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रकार झाल्यास कठोर जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Pune News : क्लेफ्टचा उपचार करा आता मोफत!

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक अमित गावडे, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, अनुप मोरे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, मारुती भापकर, धनाजी येळकर पाटील, मानव कांबळे, भाऊसाहेब अडागळे, संजय ससाणे, रवी खिलारे,गणेश भाऊ भांडवलकर, संतोष वाघे, भरत शेठ महानावर, परमेश्वर बुरले,रोहिदास शिवणेकर अरुण रणदिवे, सुनील शिंदे, सुनील भिसे, हौस राव शिंदे,युवराज कोकाटे, स्मिता पवार, कमल घोलप, स्मिता पवार,, अरुण रणदिवे, दिगंबर बालुरे, राजू सावळे, सचिन काळभोर, प्रकाश जी जाधव, लक्ष्मण रानवडे , संजय ससाने, आकाश आरगडे, लक्ष्मण रानवडे , मारुती दाखले , प्रबुद्ध कांबळे, सचिन बोराडे, रुपेश महाराज, के के कांबळे, विनोद भंडारी , विशाल शेठ मानकरी, सुरेश सकट, युवराज कोकाटे , सतीश काळे, बाबा आलम, नकुल भोईर , सचिन आल्हाट, सुरेश ठाकर, बाबा परब, सतीश मरळ, अण्णा कसबे, काशिनाथ नखाते, सरकटे, संजय जाधव, गणेश वाघमारे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.