Pune News : प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

Come forward to donate plasma; Appeal of Deputy Chief Minister Ajit Pawar

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा (रक्तद्रव) उपचार पद्धती यशस्वी ठरत असल्याने अधिकाधिक व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

प्लाझ्मा दाते आणि प्लाझ्मा स्वीकृते यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा प्रयत्न करत आहे. यासाठी http://puneplasma.in हे ॲप विकसित करण्यात आले आहे.

शासकीय निर्णय आणि कायदेशीर बाबी लक्षात घेऊन यामध्ये समन्वय साधला जात आहे. ॲपवर प्लाझ्मा दान करण्यासाठी 33 जणांनी इच्छा प्रदर्शित करून नोंदणी केली आहे तर 61 जणांनी प्लाझ्माची मागणी केली आहे.

प्लाझ्मा दात्यांच्या कुटुंबातील सदस्याला भविष्यात प्लाझ्माची गरज भासल्यास त्यांना प्लाझ्मा  प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे प्लाझ्मा दात्यांनी कोणतीही शंका मनात न ठेवता पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.