Pune News: विश्वातून कोरोनाचे संकट दूर व्हावे, भाजप शहराध्यक्षांचे गणरायाला साकडे

कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग व केसरीवाडा या मानाच्या पहिल्या पाच गणपतींचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई, मंडई, भाऊ रंगारी व नातूबाग या गणपतींचे जगदीश मुळीक यांनी रविवारी दर्शन घेतले.

एमपीसी न्यूज – विश्वातून कोरोनाचे संकट दूर व्हावे आणि नागरिकांना आरोग्यपूर्ण निरामय जीवन जगता यावे यासाठी भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी गणरायाला साकडे घातले.

कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग व केसरीवाडा या मानाच्या पहिल्या पाच गणपतींचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई, मंडई, भाऊ रंगारी व नातूबाग या गणपतींचे जगदीश मुळीक यांनी रविवारी दर्शन घेतले.

शहर भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे यांच्यासह प्रमोद कोंढरे, अरविंद गोरे, सुशील मेंगडे, संजय देशमुख, सुनील मिश्रा, गणेश वायकर उपस्थित होते.

दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने त्यातून नागरिकांची सुटका व्हावी, असेही मुळीक म्हणाले. कोरोनामुळे सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.