Pune News: गणेशोत्सव संपत आल्याने फुलांना मागणी घटली

मार्केटयार्डातील फळबाजारात कलिंगड, खरबूज, पपई, लिंबे यांची आवक घटली आहे. त्यामुळे चांगली मागणी असल्याने भावात वाढ झाली आहे.

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव आता संपत आल्याने फुलांना मागणी घटली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत झेंडूच्या भावात 50 टक्क्यांनी तर इतर फुलांच्या भावात 30 टक्क्यांनी घट झाली आहे. गौरीच्या आगमनानंतर फुलांना प्रचंड मागणी होती. विसर्जनानंतर मागणी घटली आहे.

फुलांचे प्रतिकिलोचे दर : झेंडू : 40-60, गुलछडी : 80-160, अष्टर : जुडी 20-40, सुट्टा 100-180, कापरी: 40-80, शेवंती: 40-80, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 20-40, गुलछडी काडी : 20-50, डच गुलाब (20 नग) : 60-120, लिलि बंडल : 25-35, जर्बेरा : 10-30, जुई : 500-600.

कलिंगड, खरबूज, पपई, लिंबाच्या भावात वाढ
मार्केटयार्डातील फळबाजारात कलिंगड, खरबूज, पपई, लिंबे यांची आवक घटली आहे. त्यामुळे चांगली मागणी असल्याने भावात वाढ झाली आहे. संत्रा आणि पेरुच्या भावात मात्र घट झाली आहे. अननस, मोसंबी, सिताफळ, डाळींब आणि चिक्कूचे भाव मात्र स्थिर होते.

मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने कलिंगड किलोमागे दोन रुपये, खरबूज व पपईच्या भावात प्रतिकिलोमागे पाच रुपये आणि लिंबाच्या गोणीमागे तीस रुपयांनी वाढ झाली आहे. संत्रा आणि पेरुच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

रविवारी येथील बाजारात केरळ येथून अननस 1 ट्रक, मोसंबी 40 टन, संत्री 5 ते 6 टन, डाळिंब 150 ते 175 टन, पपई 25 ते 30 टेम्पो, लिंबे दीड हजार गोणी, कलिंगड 15 ते 20 टेम्पो, सीताफळ 8 ते 10 टन, खरबुजाचे 4 ते 5 टेम्पो इतकी आवक झाली.

फळांचे भाव : लिंबे (प्रतिगोणी) : 100-150, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 100-२२20०, (4 डझन) : 30-100, संत्रा : (3 डझन) : 100-200, (4 डझन) : 20-80, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 30-120, गणेश : 5-25, आरक्ता 10-40 कलिंगड : 5-12, खरबूज : 10-30, पपई : 5-20, चिक्कू : 200-700, पेरू : 250-400, सीताफळ : 10-150.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.