Pune News: येरवडा कारागृहातील 100 कैद्यांना कोरोनाची बाधा

दोन कैद्यांचा मृत्यू झाला आहे. कारागृहात येणाऱ्या नवीन कैद्यांची यापुढे रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट केली जाणार आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन येरवडा कारागृहात 9 एप्रिल ते 15 जुलै दरम्यान कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. सर्व सुविधा कडक लॉकडाऊनमध्ये होत्या. तरीही मुख्य कारागृहातील 50 कैदी तर, अस्थायी कारागृहातील 50 कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्य कारागृहातील 50 व अस्थायी कारागृहातील 50 कैद्यांना मिळून एकूण 100 कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे. त्यापैकी दोन कैद्यांचा मृत्यू झाला आहे. कारागृहात येणाऱ्या नवीन कैद्यांची यापुढे रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.