-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : उद्घाटन कार्यक्रमात गर्दी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीडशे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी जमलेल्या गर्दीवर पोलीस काय कारवाई करणार याची चर्चा सोशल मीडियात सुरू असतानाच पुणे पोलिसांनी या प्रकरणी आता कारवाई केली आहे. ही गर्दी जमवत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 100 ते 300 कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महेश रमेश हांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, बाळासाहेब बोडके, सरचिटणीस रोहन पायगुडे यांच्यासह शंभर ते दीडशे अनोळखी महिला आणि पुरुष या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार दिनेश वीर यांनी फिर्याद दिली आहे. भादवी कलम 188, 269, 270 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ब, महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 चे कलम 11 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.