Pune News : सराईत गुन्हेगाराला लोड पिस्तुलासह शिवाजीनगर येथून अटक, युनिट 4 ची कामगिरी

एमपीसी न्यूज – पुणे शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला लोड पिस्तुलासह शिवाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या युनिट 4 ने कामगिरी बुधवारी (दि.22) ही कामगिरी केली. त्याच्या कडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

अतिक शेख असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजीनगर एसटी स्टॅन्ड परिसरात लोड पिस्तूल कमरेला लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिवाजीनगर एसटी स्टॅन्ड परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 31 हजार रूपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

आरोपी अतिक शेख हा पुणे शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, मारामारी, अग्नी शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस रिमांड दिली आहे. पुणे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.