Pune News : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार -अण्णा साहेब डांगे

एमपीसी न्यूज – धनगर समाजाला अजूनही राज्य सरकारने मराठा, ओबीसी समाजाप्रमाणे आरक्षण दिले नाही. धनगर समाजाला अजूनही काही ठिकाणी राज्य सरकारने योग्य ते मूलभूत गरजा दिल्या नाहीत.

मराठा, ओबीसी समाजाप्रमाणे धनगर समाजाचे ईपेरिकल डेटा मुळे राज्य सरकारने आरक्षण रखडवले आहे.येत्या 8 दिवसात सरकारने धनगर समाजाला जर आरक्षण दिले नाही तर येतील पुढील काळात राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करणार अशी माहिती माजी मंत्री अण्णा साहेब डांगे यांनी आज पुण्यात पत्रकारांना दिली.

माजी मंत्री अण्णा साहेब डांगे म्हणाले, आज आमच्या धनगर समाजाची पहिली आरक्षण परिषद पुण्यात पार पडली. आमच्या धनगर समाजाच्या आरक्षण परिषदेत सर्वाच्या एकमताने येत्या 8 दिवसात समाजाची एक समिती स्थापन करणार आहोत. त्या समिती मधून धनगर समाजाला आरक्षण राज्य सरकार लवकरात लवकर कसे देऊ शकते या साठी ही समिती प्रयत्न करणार आहे.

राज्य सरकारने धनगर समाजातील तळागाळातील लोकांसाठी त्यांच्या मूलभूत गरजा या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशी आमची प्रमुख मागणी आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लवकरात लवकर धनगर ओबीसी व मराठा यांच्याप्रमाणे जो राज्य सरकारने ईपेरिकल डेटा मुळे आरक्षण रखडवले आहे. मराठी ओबीसी व धनगर समाजाला सगळ्यांना प्रत्येकाच्या मागणीनुसार राज्य सरकारांने आरक्षण द्यावे, अशी आम्ही मागणी राज्य सरकारकडे करत आहोत. असे अण्णासाहेब डांगे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.