Pune News: मागणी स्थिर असल्याने मासळीचे दर टिकून

Pune News: Fish prices remain stable as demand remains stable श्रावणामुळे चिकनला मागणी कमी असल्याने दरात 10 रुपये घट झाली आहे. अंडी गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. मटणाला मागणी कायम आहे.

एमपीसी न्यूज – देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून गणेश पेठेतील बाजारात मासळीची आवक होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत मागणी स्थिर असल्याने दर टिकून आहेत.

श्रावणामुळे चिकनला मागणी कमी असल्याने दरात 10 रुपये घट झाली आहे. अंडी गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. मटणाला मागणी कायम आहे. तरीही भाव स्थिर असल्याचे व्यापारी रुपेश परदेशी व प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.

गणेश पेठेतील मासळीबाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची सुमारे 4 ते 5 टन, खाडीची सुमारे 100 ते 200 किलो तर नदीच्या मासळीची 500 ते 600 आवक झाली. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला व सिलनची सुमारे 5 ते 6 टन आवक झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी म्हणाले.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :
पापलेट : कापरी : 1200-1300, मोठे 1200, मध्यम : 800, लहान 550, भिला : 480, हलवा : 550, सुरमई : 550-650, रावस : लहान 550 -600, मोठा : 900-, घोळ : 800, भिंग : 360, करली : 280, करंदी : 240, पाला : 1000-1200, वाम : पिवळी लहान 480, मोठी 550, काळी : 280, ओले बोंबील : 240, कोळंबीः लहान 240-280, मध्यम 400 मोठे 480-550, जंबोप्रॉन्स : 1200.

किंगप्रॉन्स : 700 लॉबस्टर : 1000-1200, मोरी : 280 -320, मांदेली : 240, राणीमासा : 240 खेकडे लाल : 280, चिंबोर्‍या : 480. खाडीची मासळी : सौंदाळे : 280, खापी : 240, नगली : 550, तांबोशी : 440, पालू : 280, लेपा : 240, शेवटे : 280, बांगडा : लहान 300 , मोठा 360, पेडवी : 100, बेळुंजी : 160-180, तिसर्‍या : 280, खुबे : 120 -140, तारली : 160 नदीची मासळी : रहू : 160, कतला : 180, मरळ : 400-440 शिवडा : 280, खवली : 280, आम्ळी : 160, खेकडे : 240 वाम : 550

चिकन : चिकन : 170, लेगपीस : 200 जिवंत कोंबडी : 140, बोनलेस : 270. अंडी : गावरान : शेकडा : 610 डझन : 84 प्रति नग : 7, इंग्लिश : शेकडा : 382 डझन : 54 प्रतिनग : 4.5.

मटण : बोकडाचे : 640 बोल्हाईचे : 640 खिमा : 640, कलेजी : 640.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.