Pune news : मित्र सरपंच झाला म्हणून थेट फॉर्च्यूनर गाडी गिफ्ट 

एमपीसी न्यूज -नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आले. प्रस्थापितांचे धाबे दणाणले तर काही नवखे सदस्य निवडून आले. निवडून आलेल्यांनी केलेला जल्लोष पाहण्यासारखा होता. या निवडणुकीनंतर असे काही प्रकार समोर आले की त्याची चर्चाही सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात होऊ लागली. पुण्याच्या केसनंद गावातील अशीच एक घटना आता चर्चेत आली आहे. मित्र सरपंच झाला म्हणून  त्याला फॉर्च्युनर गाडी गिफ्ट देण्यात (Pune news) आली.

केसनंद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी दत्तात्रय हरगुडे तर उपसरपंच पदी सुरेखा बांगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर दत्तात्रय हरगुडे यांना त्यांच्या मित्रांनी दिलेल्या बक्षिसाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. दत्तात्रय हरगुडे यांना त्यांच्या मित्रांनी   भेट म्हणून थेट फॉर्च्युनर गाडीच दिली आहे.

Narhe News : भंगारमालाच्या गोडाऊनला भीषण आग

दत्तात्रय हरगुडे हे सामान्य कुटुंबातील आहेत. मित्राच्या एका हाके वर ते अर्ध्या रात्री धावून जातात अशी त्यांची केसनंद परिसरात ओळख आहे. दत्तात्रय हरगुडे सरपंच झाला म्हटल्यावर त्याच्या मित्र परिवारांनी मिळून फॉर्च्युनर गाडी गिफ्ट दिली. दत्ता हे कधीही स्वतःवर खर्च करत नाहीत. आपल्याकडे जे आहे ते समाजाचा आहे या विचाराने ते काम करत असतात. त्यामुळे त्यांना काहीतरी द्यावं (Pune news) असं आमच्या मनात होतं. आणि म्हणूनच आम्ही त्यांना ही गाडी गिफ्ट दिली असं त्यांच्या मित्रांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.