Pune News: पुणे स्मार्ट सिटीचे चार प्रकल्प पूर्ण

मागील 5 ते 6 महिन्यांपासून पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे स्मार्ट सिटीतर्फे कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज – पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने नुकतेच पायाभूत सुविधांचे चार प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. हे प्रकल्प तयार झाले असून, पुणे महापालिकेस हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.

महिलांसाठी व्यायामशाळा, सामुदायिक शेती संकल्पनेवर आधारित प्लेसमेकिंग पार्क, स्मार्ट क्लिनिक, जलतरण तलाव असे एकूण चार प्रकल्प पुणे स्मार्ट सिटीने पूर्ण केले आहेत. स्मार्ट सिटी मिशनमध्ये क्षेत्र आधारित विकास कामांअंतर्गत औंध, बाणेर आणि बालेवाडी परिसरात विविध प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यापैकी या चार प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे.

सीईओ रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीकडून पूर्ण करण्यात आलेले प्रकल्प नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. तर, मागील 5 ते 6 महिन्यांपासून पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे स्मार्ट सिटीतर्फे कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे.

पुणेकरांच्या दृष्टीने ही कंट्रोल रूम अतिशय महत्वपूर्ण असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार अमोल कोल्हे यांनी भेट देऊन म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.