Pune News : मला चंपा आणि फडणवीसांना टरबूज्या म्हणतात ते चालत का ? – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मला पवार साहेबांबाबत असं बोलायचं नव्हतं. मी नेहमीच शरद पवार यांच्याबद्दल चांगलं बोलतो. मात्र, तुम्ही मोदींवर, शहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालतं का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, मी नेहमीच शरद पवार यांच्याबद्दल चांगलं आणि आदारानं बोललो. मात्र, त्याचे कधीच कौतुक झाले नाही.

तसेच तुमचे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल व अमित शहांवर जे बोलतात ते चालतं का, मला चंपा आणि देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणतात ते चालतं का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल देखील बोलतो. पण त्यांच्याकडून किंवा शिवसेनेकडून कधी काही प्रतिक्रिया आली नाही. त्यांना हे माहित आहे की राजकारणात या गोष्टी चाललात. त्या प्रतिक्रियांमध्ये मनापासून काहीच नसते असे ते म्हणाले. शरद पवार यांच्याबद्दल मी नेहमीच आदारानं बोललो आहे. मला जी भूमिका मांडायची होती ती मी मांडली. माझ्याकडून हा विषय संपला आहे.

मी नेहमीच ‘रात गायी बात गयी’ या स्वभावाचा आहे. त्यामुळे माझ्याकडून हा विषय संपला आहे. त्यांना सुरु ठेवायचा असेल तर त्यांनी तो ठेवावा, असे पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.