Pune News : मी सल्ला घेण्यासाठी शरद पवार यांना फोन करतो – मुख्यमंत्री शिंदे

एमपीसी न्यूज : ‘मी सल्ला घेण्यासाठी शरद पवार यांना फोन करतो’ (Pune News) असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) 46 व्या सर्वसाधारण सभेत बोलत होते. या सभेत शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच शरद पवार यांच्या सोबत एकाच व्यासपीठावर आले. आणि यावेळी त्यांनी शरद पवार यांची चांगलीच स्तुती केली आहे.   

Talegaon Dabhade : तळेगाव येथे विहार सेवकांचा विभागीय मेळावा

ते आपल्या भाषणात म्हणाले, की शरद पवार यांच्या तोंडी नेहमी साखर असते. गेल्या आठवड्यात संक्रात झाली, त्यामुळे गोड गोड बोलायचं, मीही गोड गोड बोलणार. मी नुकतंच दाओसला जाऊन आलो. कोणी काहीही म्हणो पण मी चांगली गुंतवणूक आणलेली आहे. शरद पवार यांना यासंदर्भात माहिती आहे. शरद पवार राज्याच्या हितासाठी, भल्यासाठी नेहमी मार्गदर्शन करतात. मलाही जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा फोन करतात तेव्हा सूचना करतात. सहकार क्षेत्रात त्यांचं असणारं योगदान हे नाकारता येणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांचं (Pune News) कौतुक केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.