Chinchwad Bye Election : जगताप कुटुंबातील उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध करावी; राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची भूमिका

एमपीसी न्यूज – चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Chinchwad Bye Election) यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत काम केले आहे. जगताप हे पक्षप्रमुख शरद पवार अथवा अजित पवार यांच्यावर नाराज होऊन भाजपा मध्ये गेले नाहीत. त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. या पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबातील उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध करावी, अशी भूमिका राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे. 

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अवघ्या 15 दिवसात अनपेक्षितपणे पोटनिवडणूक जाहीर झाली. 27 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस कमालीचे सक्रिय झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

आमदार बनसोडे म्हणाले, लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत काम केल आहे.
नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, विधानपरिषद आमदार अशी विविध पद त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सांभाळली. जगताप हे पक्षप्रमुख शरद पवार अथवा अजित पवार यांच्यावर नाराज होऊन भाजपामध्ये गेले नाहीत. त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे.

Talegaon Dabhade : तळेगाव येथे विहार सेवकांचा विभागीय मेळावा

चिंचवड मतदार संघाची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. त्याचा (Chinchwad Bye Election) कालावधी दोन वर्षाचा असणार आहे. या पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबातील सदस्यालाच भाजपाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
कालावधी कमी असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात यावी. पोटनिवडणूक लढविण्याबाबत वरिष्ठ पातळींवर निर्णय झाल्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यालाच संधी देण्यात यावी, असेही आमदार बनसोडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जगताप यांचे सर्वपक्षीयांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे होते. अंत्यविधीला मोठा जनसागर लोटला होता. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांमध्ये जगताप परिवाराबाबत सहानुभूती आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल अशीही एक शक्यता वर्तविली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.