Pune News : ‘मी लस घेतो आणि तुला येऊन कळवतो’ – अजित पवार

एमपीसी न्यूज – पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लस कधी घेणार याबाबत एका पत्रकाराने प्रश्न विचारला. यावर अजित पवार म्हणाले, आम्हाला ज्यावेळेस लस घेण्याची परवानगी मिळेल त्यादिवशी आम्ही घेऊ. तसेच, लस घेतल्यानंतर तुला येऊन कळवतो असे उत्तर अजित पवार यांनी दिले आणि पत्रकारांमध्ये एकच हाशा पिकला.

कोरोना प्रतिबंध लसीची सुरक्षितता, परिणामकारकता याबाबत साशंकता व्यक्त करत राज्यात लसीकरणाला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. राज्यात लसीकरणाच्या पहिल्या दिवशी अपेक्षेच्या 64 टक्के लसीकरण झाले, तर मंगळवारी 50 टक्के तर, बुधवारी 68 लसीकरण झाले. यावरुन पवारांना दादा, तुम्ही कोरोनाची लस केव्हा घेणार? असा सवाल पत्रकारांकडून विचारण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

अजित पवार उत्तर देताना म्हणाले, ‘लस घेण्याची परवानगी मिळेल तेव्हा घेऊ. आम्ही पॅरामेडीकल स्टाफ नाही, नर्स नाही, पोलीस मध्ये मोडत नाही, ज्यावेळेस आदेश येतील यांनाही घेण्याची परवानगी आहे. तसे आदेश निघाले की लगेच लस घेऊ आणि तुला सांगू आम्ही लस घेतली म्हणून’ असे अजित पवार म्हणाले.

सीरम इन्सटिट्यूट मध्ये लागलेल्या आगी बाबत माहिती देताना पवार म्हणाले, लागलेल्या आगीबाबत ऑडिट सुरु करण्यात आले आहे. कोणत्या कारणामुळे आग लागली याबाबत शोध घेणं सुरू आहे. जे काही असेल ते सांगितले जाईल याप्रकरणी दडवण्यासारखे असे काहीच नाही असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1