Pune News : लोकअदालतीमध्ये 72 लाखांच्या वीजबिलांसंबंधी प्रकरणे निकाली

एमपीसी न्यूज – महावितरणच्या पुणे परिमंडलामधील 72 लाख 52 हजार 689 रुपयांच्या थकीत वीजबिलासंबंधी न्यायप्रविष्ट असलेली 107 प्रकरणे येथे नुकत्याच झालेल्या येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली निघाली आहेत. तडजोडीअखेर ही सर्व रक्कम संबंधीत ग्राहकांकडून भरण्यात येत आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्या वतीने आयोजित नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पुणे परिमंडलातील थकती वीजबिलाबाबत न्यायप्रविष्ट असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये गणेशखिंड मंडलमधील सर्वाधिक 67 लाख 52 हजार 942 रुपयांची 87 प्रकरणे, रास्तापेठ मंडलमधील 2 लाख 52 हजार 960 रुपयांची 2 प्रकरणे आणि पुणे ग्रामीण मंडलमधील 2 लाख 46 हजार 787 रुपयांची 18 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या कामकाजामध्ये महावितरणकडून विधी सल्लागार सत्यजित पवार, सहायक विधी अधिकारी ज्योत्स्ना सोनोने, समीर चव्हाण, कनिष्ठ विधी अधिकारी अंजली चौगुले, गणेश सातपुते तसेच अभियंता, अधिकारी, वित्त व लेखा विभागातील सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.