Pune News : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिका नेमणार ट्राफिक  प्लॅनर

एमपीसी न्यूज – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता ट्रॅफिक प्लॅनर नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या पूर्वी हे पालिकेने या पदासाठी दोन वेळा जाहीरात काढली होती. मात्र, त्यात केवळ सहा महिन्यांची मुदत या पदासाठी होती. मात्र, त्यासाठी प्रतिसाद न आल्याने तीन वर्षे मुदतीसाठी हे पद भरले जाणार असून त्याबाबतची जाहीरात नुकतीच काढण्यात आली आहे.

शहरातील वाहतूक समस्या कायम असल्याने ही कोंडी फोडण्यासाठी महिन्याला तब्बल 2 लाखांचे मानधन देऊन महापालिका शहरासाठी ट्रॅफिक प्लॅनर ( वाहतूक नियोजनकार) नेमणार आहे.  या सल्लागाराची नियुक्ती तीन वर्षांसाठी केली जाणार असून त्याला तब्बल 72 लाखांचा खर्च महापालिका करणार आहे. विशेष म्हणजे या सल्लागाराला दिले जाणारे वेतन हे महापालिका आयुक्तांच्या वेतनापेक्षाही अधिक असणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेत शहराच्या वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र अधिकारी आणि विभाग असतानाही या एका पदासाठी एवढ्या पैशाची उधळपट्टी कोणाच्या अट्टाहासाठी असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.