Pune News : महापालिकेची जीबी ऑफलाइनच ; भाजपाच्या मनसुब्यावर राष्ट्रवादीचे पाणी

एमपीसी न्यूज : तब्बल आठ महिन्यांनतर महापालिकेची मुख्य सर्वसाधारण सभा (जीबी) येत्या सोमवारी (8 फेब्रुवारी) ऑनलाईन घेण्याची जय्यत तयारी सुरू होती. परंतु ऑनलाईनचा गैरफायदा घेत बहुमताच्या जोरावर विषय मंजूर करण्याच्या शक्यतेमुळे राष्ट्रवादीकडून ऑफलाईन म्हणजे मुख्य सभागृहातच घेण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली त्यावर 200 पटसंख्येच्या मर्यादेत जीबी घ्या आदेश काढायला सांगतो, असे निर्देश दिले आहेत.

दरम्यान काँग्रेस पक्षाने ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे शहरावर दूरगामी परिणाम होणारे शहराचे वादग्रस्त विषय मंजूर न करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे महापौर मुरलीधर मोहोळ, प्रभारी नगरसचिव शिवाजी दौंडकर यांच्याकडे केली आहे.

शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक धोरणात्मक निर्णय सर्वसाधारण सभा न झाल्यामुळे प्रलंबित आहेत. त्यामुळे आता सत्ताधारी भाजपने सर्वच विषयांवर निर्णय घेण्याचे ठरवले आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांच्या कार्यपत्रिका एकत्र करण्यात आल्या आहेत.

सर्वसाधारण सभेसाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयामध्ये मोठे टिव्ही बसविण्यात आले आहेत. तर महापालिकेत पदाधिकारी आणि महापौर कार्यालयामध्ये ऑनलाईन सभेची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ म्हणाल्या, ऑनलाईन जीबी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितली. त्यावर 200 पटसंख्येची मर्यादा पाळत शारीरिक आंतरपालन, तोंडाला मास्क इत्यादी नियमांनुसार जीबी प्रत्यक्ष सभागृहात घ्या, शासकीय आदेश काढायला सांगतो असे सांगितले. ऑनलाईन जीबीतून भाजपाच्या छुप्या मनसुब्यावर आम्हाला पाणी टाकायचे आहेत, असे स्पष्ट केले.

त्यामुळे ऑफलाईन जीबीवर महापौर मोहोळ नेमका कोणता निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.