Pune News : आता प्रत्येक कोविड हॉस्पिटलमध्ये ‘डेथ ऑडीट कमिटी’!

एमपीसी न्यूज – राज्यभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी प्रत्येक कोविड हॉस्पिटलमध्ये ‘डेथ ऑडीट कमिटी’ नेमण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. पुणे महापालिकेला देखील नुकतेच हे आदेश प्राप्त झाले असून त्यानुसार पालिकेने प्रत्येक रुग्णालयास तातडीने समित्या नेमण्याच्या सूचना केल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

राज्यसरकारच्या आदेशानुसार या समितीत रुग्णालयाचे अधिक्षक, फिजिशियन तसेच शासकीय अथवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील फिजिशियन, बालरोग तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ यांचा समावेश असणार आहे. कोरोना साथीवर प्रभावी नियंत्रण करण्यासाठी तसेच या आजाराने होणारे मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

एका बाजूला राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा घटत असला तरी या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रण आणि मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी तातडीने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे ‘डेथ ऑडीट’ होणे गरजेचे आहे. मात्र, ते केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच काही ठराविक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनच केले जात आहे. त्यामुळे पुरेसे निष्कर्ष समोर येत नसल्याने ज्या मोठ्या रुग्णालयांना कोविड रुग्णालयांचा दर्जा मिळाला आहे. तसेच ज्या ठिकाणी मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अशा सर्व रुग्णालयांना आता शासनाने हे ऑडीट बंधनकारक केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like