Pune News: राष्ट्रवादीच्या वतीने 25 एप्रिल रोजी नऱ्हे येथे रोजगार मेळावा

एमपीसी न्यूज – दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना संसर्गमुळे जनजीवन विस्कळित झाले असताना अनेकांचे उद्योग- व्यवसाय, नोकरी बंद झाले आहेत. जीवनमान पूर्वपदावर येत असले तरी अनेक तरुण – तरुणी अजूनही बेरोजगार आहे. यामुळेच राष्ट्रवादी काँगेस व शिवराज्य समूह यांच्या वतीने 25 एप्रिलला नऱ्हे येथील समृद्धी लॉन्स या ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरात सध्या अनेकांना नोकरीचा प्रश्न भेडसावत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या रोजगार मेळाव्यात राष्ट्रीय पातळीवरील नामांकित कंपन्यांचे एच आर प्रतिनिधी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेणार आहेत. यातून आपल्या भागातील तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे.

 

रोजगार मेळाव्यात पाचवी ते पदवीधरपर्यंत शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरी उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरील 30 पेक्षा जास्त नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी असणार आहेत.

शहर व परिसरातील युवक व युवतींनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.mahajobz.com/bhupendramore या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा, असे आवाहन आयोजक भूपेंद्र मोरे यांनी केले आहे. अधिक महितीसाठी 9822412540, 7387447337 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे त्यांनी म्हटले आहे.

 

या दिवशीच प्रभागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप तसेच रक्त तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. समाजातील गतीमंद व अनाथ मुलांना खाऊ वाटप देखील करण्यात येणार असल्याची माहिती भूपेंद्र मोरे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.