Pune News: गुणरत्न सदावर्ते विरोधात पुण्यात आणखी एक तक्रार दाखल, अडचणी वाढण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासमोरील अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सदावर्ते यांना मुंबई सातारा आणि त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यातही एक गुन्हा दाखल आहे. सदावर्ते यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सदावर्ते यांच्या विरोधात शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्ने सदावर्ते व जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करावा म्हणून एक अर्ज दिला आहे. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.

 

जयश्री पाटील व गुणरत्ने सदावर्ते यांनी युट्युब चॅनेल वर मराठा समाजाची उत्पत्ती कशी झाली व कुठून आले, यावर आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आहे. या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिले आहे.

 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मुंबई उच्च न्यायालयात सदावर्ते यांनी मराठा समाजाची उत्पत्ती कशी झाली, याबाबत एक आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानात गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या जन्माबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्याचबरोबर सदावर्ते यांनी मराठा समाजाची चुकीची वंशावळी देखील सांगितली होती. हा समाज फक्त थोतांड मांडून आरक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका देखील सदावर्ते यांनी केली होती.

 

आता या सगळ्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अधिकच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करत सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.