Pune News : मेहरबाबा व डेक्कन कॉलेजबद्दलचे एक दिवसीय परिचय सत्र संपन्न

एमपीसी न्यूज – मेहरबाबा यांच्या जीवनाचात्यांच्या (Pune News) जीवनकार्याचा आणि शिकवणीचा परिचय अधिकाधिक लोकांना व्हावा तसेच डेक्कन कॉलेजच्या गौरवशाली परंपरेचे देखील लोकांना ज्ञान व्हावे, यासाठी शनिवारी (दि.11) एका डेक्कन कॉलेज येथे एक दिवसीय परिचयसत्राचे आयोजन केले होते. मेहेरबाबा प्रेमी आणि डेक्कन कॉलेज यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजत केला होता.

 

यावेळी कुलसचिव डॉ. अभिजित दांडेकरअवतार मेहेरबाबा पुणे केंद्राचे कार्यकारिणी सदस्य आणि नगरच्या मेहेरबाबा ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते.

 

यावेळी मेहेरबाबांच्या जीवनाशी व कार्याशी संबंधित छोट्या दृश्य फितींसोबत बाबांचे कार्य आणि संदेश याची प्रारंभिक माहिती या परिचय सत्रातील भाषणांद्वारे लोकांना करून देण्यात आली. मेहेरबाबांच्या काही शिष्यांनी बाबांची आध्यात्मिक अवस्था आणि अधिकार, सदगुरू आणि अवतार यांच्या अवस्थांमधील साम्य आणि अधिकारांमधील भेदआध्यात्मिक संरचना, मेहेरबाबांशी संबंधित पुण्यातील स्थानांची माहितीबाबांचे महामौन, दैवी योजना स्पष्ट करणारी त्यांची मानचित्रसंस्कारांविषयीची त्यांची आध्यात्मिक शिकवण अशा बौद्धिक खाद्य पुरवणाऱ्या अनेक विषयांसोबतच बाबांच्या महत्त्वाच्या संदेशांचे वाचन आणि भावनिक साद घालणारी भक्तिगीते असा भरगच्च व समतोल कार्यक्रम होता. सुरुवातीला झालेल्या एका सुबक साध्या उद्घाटन सोहळ्यामध्ये कॉलेजचे प्र-कुलगुरू प्रो. प्रसाद जोशी यांनी डेक्कन कॉलेजच्या वाटचालीचा आढावा घेतला.

 

Pune News : विद्यापीठ चौकातील पुलाच्या बांधकामामुळे जड वाहनांना बंदी

 

पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधनासाठी डेक्कन कॉलेज ही पुण्यातील एक (Pune News) प्रथितयश संस्था आहे. या संस्थेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी राजकारणसमाजकारणसाहित्यवैद्यकशास्त्र आदी अनेक क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व यश संपादन केले आहे. ऑक्टोबर 1821 मध्ये हिंदु कॉलेज या नावाने प्रारंभ झालेल्या या संस्थेने दोन वर्षांपूर्वी त्यांचे द्विशताब्दी वर्ष साजरे केले.

स्वतःला सद्य युगाचे ईश्वरावतार घोषित केलेल्या मेहेरबाबांनी देखील 1912 व 1913 या दोन वर्षांमध्ये येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले होते. त्या काळात ते मेहेरवान शेरीयार इराणी या त्यांच्या मूळ नावाने ओळखले जात असत. जानेवारी 1914 मध्ये पुण्यातीलच वयाची शंभरी गाठलेल्या स्त्री सदगुरु हजरत बाबाजान यांनी मेहेरवानच्या कपाळाचे अवघ्राण केले आणि त्याचे दिव्यत्व अनावृत्त केले. यानंतर मेहेरबाबांचे महाविद्यालयीन शिक्षण संपुष्टात आले. या घटनेने केवळ मेहेरवानचा जीवनक्रम बदलला नाही तर समस्त सृष्टीच्या नवीन वाटचालीचे आणि आध्यात्मिक परिवर्तनाचे सूतोवाच केले गेले.

 

श्री मेहेरनाथ कलचुरी यांनी नगर ट्रस्टच्या कार्याची व निस्वार्थभाव सेवेची उपस्थितांना माहिती करून दिली. फेब्रुवारी महिन्यात मेहेरबाबांवरील जवळजवळ 90 पुस्तकांचीज्यात बाबांचे डिस्कोर्सेस आणि गॉड स्पीक्स ग्रंथ सामील आहेतदेणगी देऊन जगभरच्या मेहेरबाबा प्रेमी प्रकाशकांनी डेक्कन कॉलेजच्या ग्रंथसंपदेत मोलाची भर टाकलेली आहे. आध्यात्मिक अभ्यासकांना त्याचाही लाभ घेता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.